छगन भुजबळ यांना यावेळी अजित पवार गटात येण्याचा निर्णय चुकला का ? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी तुम्हाला वाटत असेल पण मला वाटत नाही असे भुजबळ म्हणाले तसेच सहानुभूतीबाबत मी जे बोललो.ते मतपेटीने दाखवून दिले अशी प्रतिक्रिया दिली.शरद पवार गटाकडे जाण्याचा दरवाजा उघडा ठेवलाय का ? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा असे तुम्हाला वाटतं.हा तुमचा प्रचार आहे.या सर्वात मी नेहमी सत्याची बाजू घेत आलो आहे.मला जे वाटते खरे आहे तेच बोलतो.मला वाटले की या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे.तेव्हा सांगतो मला उत्तर नाही द्यायचे असे काही नाही.ना माझी खिडकी उघडी आहे ना माझा दरवाजा उघडा आहे.ना कोणी माझ्यासाठी रेड कार्पेट टाकले आहे असे काही नाही.वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावले टाकायची आहे त्यातून काही धडा घ्यायचा आहे.पक्षाला आणि युतीला.ज्या त्रुटी आहे त्या दूर करायच्या आहेत.मी आहे त्या पक्षात युतीसोबत राहणार असे स्पष्ट उत्तर दिले आहे.