दरम्यान पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे बीडमधील एका व्यक्तीने दु:खावेगात आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली त्याचाही धनंजय मुंडेंनी यावेळी उल्लेख केला.ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंचा पराभव झाला तो त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या बीडमधल्या काही बांधवांना सहन झाला नाही त्यांनी आपला जीव समर्पित केला पण ते फार दु:खदायक आहे ते आपण थांबवले पाहिजे.आपला जीव संपवण्यासाठी नाही तर येणारी निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वाचे आहे.हा पराभव पचवताना या सगळ्या घटनांमुळे अधिकच दु:ख आम्हाला होत आहे अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी आत्महत्येच्या घटनेवर वेदना व्यक्त केल्या.लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचे नुकसान झाले आहे.विधानसभेत चित्र काय असेल ते मी आजच सांगत नाही.येणारा काळ ठरवेल.आज त्यावर बोलणे फार लवकर होईल.तीन महिने जायचे आहेत.तीन महिन्यांनंतर महायुती म्हणून निवडणूक लढवत असतांना तेव्हा काय असेल याची चिकित्सा आज होऊ शकत नाही असे ते म्हणाले. दरम्यान निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवानेंनी आपण धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे विशेष आभार मानतो असे म्हटल्यामुळे त्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.त्यावर धनंजय मुंडेंनी भाष्य केले.निवडून आलेल्या खासदारांनी माझे विशेष आभार मानन म्हणजे त्यांना संभ्रम निर्माण करण्याचा सल्ला कुणीतरी दिला आहे अशा प्रकारचे आभार त्यांनी मानावेत आणि तेही माझे आणि सुरेश धस यांचे हे न पटणारे  आहे यामागे संभ्रम निर्माण करणे आणि त्यातून वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची यासंदर्भातले विधान त्यांचे दिसत आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.