Just another WordPress site

चिंचखेडा आदिवासी बालिका खुन प्रकरणातील मुलीच्या कुटुंबास शासनाची आर्थिक मदत

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ जून २४ सोमवार

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे दि ११ जून २४ रोजी एका नराधमाकडून सहा वर्षे बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा मनाला सुन्न करणारा संतापजनक प्रकार घडला होता व या घटनेचे पडसाद जळगाव जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात पडले होते.

दरम्यान चिंचखेडा येथील खुन झालेल्या बालिकेच्या कुटुंबास राज्य शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य म्हणून यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्यामार्फत न्युक्लिअस बजेट योजनेतून पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदतीचा धनाकर्षे अत्याचारीत मुलीच्या कुटुंबीय मनिषा दिपक भिल यांना महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन याच्या हस्ते नुकताच देण्यात आला.यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार,लेखाधिकारी प्रविण रोकडे यांच्यासह कार्यालयातील आदि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.