यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जून २४ सोमवार
येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीची सन २०२३ -२०२४ ची वार्षीक सर्वसाधारण सभा काल दि.१६ जुन रविवार रोजी संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली.
सदरील सभेत सन २०२४ ते २०२७ साठी विश्वस्थ मंडळाची निवड करण्यात आली असून यात संस्थेच्या अध्यक्षपदी महेश वासुदेव वाणी तसेच उपाध्यक्षपदी तेजस सतीष यावलकर तर सचिवपदी श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.संस्थेच्या सह सचिव म्हणून संतोष श्रीहरी कवडीवाले,कोषाध्यक्षपदी ईश्वरलाल राजाराम वाणी तर सदस्यपदी जिवन वासुदेव यावलकर व प्रशांत ईश्वरलाल श्रावगी यांची निवड करण्यात आली आहे.संस्थेची वार्षीक सभा ही अत्यंत खेळी मेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष महेश वासुदेव वाणी हे होते.सभेचे सुत्रसंचालन तेजस यावलकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीहरी कवडीवाले यांनी मानले.