Just another WordPress site

तालुक्यातील शेतकऱ्यांवर हवामान आधारीत फळविम्यावरून अन्याय होवु देणार नाही-ना.गुलाबराव पाटील यांचे आश्वासन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ जून २४ सोमवार

तालुक्यातील फळपीक उत्पादकांना हवामानवर आधारित तापमानाच्या निकषाच्या गोंधळात यावल तालुक्यातील वगळण्यात आले असून फळपिक विम्याच्या निकषात तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे) गटाच्या पदधिकाऱ्यांच्या वतीने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना नुकतेच देण्यात आले.

दरम्यान आपण तात्काळ संबधित विभागास आदेश देवुन योग्य प्रकारे कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देवु असे आश्वासन त्यांनी शिवसेना (शिंदे) गटाच्या पदधिकाऱ्यांना दिले आहे.याप्रसंगी यावल तालुक्यातील शेतकरी हे पिक विम्याच्या निकषात पात्र असतांना पिक विमा कंपनीच्या गोंधळलेल्या निकषामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या लाभापासून वंचित व्हावे लागत असल्याने हा शेतकऱ्यांवर अन्याय असून तरी शासनाच्या वतीने या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकतेच निवेदन देऊन विनंती करण्यात आली.यावेळी शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार,यावल तालुकाप्रमुख राजाभाऊ काटोके,उपप्रमुख रामभाऊ सोनवणे यावल शहराध्यक्ष पंकज बारी यांच्यासह अन्य शिवसेना (शिंदे) गटाचे पदधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.