मुंबई आणि महाराष्ट्रात ‘एम’ घटकामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला यश मिळाल्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले,‘एम’ म्हणजे मराठीबरोबरच आम्हाला हिंदू,मुस्लीम,ख्रिाश्चनांसह सर्व भाषिकांची मते मिळाली आहेत.लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीय आणि भाषकांनी महाविकास आघाडीला भरभरून मते दिली.हजारो लोकांनी रक्त साडून मिळवलेली मुंबई भाजपाला लुटू देणार नाही असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा (एनडीए) महाविकास आघाडीसमोर (इंडिया) निभाव लागला नाही तर देशभर इंडिया आघाडीने एनडीएसमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३१ जाग जिंकल्या तर महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या.राज्यात काँग्रेसने सर्वाधिक १३,ठाकरे गटाने ९ आणि शरद पवार गटाने ८ जागा जिंकल्या तर महायुतीतल भाजपाने ९ शिंदे गटाने ७ आणि अजित पवार गटाने १ जागा जिंकली आहे.