छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीयांनी हे सांगितले की छगन भुजबळांकडे अनेक पर्याय आहेत व त्यांचा सारासार विचार करुन ते निर्णय घेतील. समता परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही पण अजित पवार गटातून छगन भुजबळ बाहेर पडणार हे निश्चित आहे असे हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.आणखी एका नेत्याने सांगितले की ओबीसी कोट्याबाबत छगन भुजबळ यांची भूमिका ठाम आहे तसेच लोकसभेचे निकाल आले आहेत त्यानंतर छगन भुजबळांना त्यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे.महायुतीने त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ असे म्हटले होते मात्र त्यांचे नावच जाहीर केले नाही व शेवटी छगन भुजबळ यांनी माघार घेतली त्यानंतर त्यांनी अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाला वेठीस धरले नाही.महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना त्यांनी छुपा पाठिंबा दिला हे आता जवळपास सगळ्यांना माहीत आहे एवढेच नाही तर जे मताधिक्य शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळाले त्याबद्दल भुजबळ यांनी दोघांचे उघड कौतुकही केले होते असेही या नेत्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले.छगन भुजबळ हे साधारण मागच्या वर्षभरापासून महायुतीच्या धोरणाविरोधात भूमिका घेत आहेत.ओबीसी आंदोलनापूर्वी त्यांनी दिलेला राजीनामा असो किंवा त्यांनी पुढे मांडलेल्या भूमिका असोत या सगळ्या महायुतील्या साजेशा नव्हत्या.ओबीसींसाठी आवाज उठवणारे ते एकमेव नेते ठरले आहेत त्यामुळे ते वेगळा निर्णय घेतील आणि लवकरच ते हा निर्णय घेतील असेही त्यांच्या जवळच्या नेत्याने सांगितले.