तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली !! विकास आयुक्त,असंघटित कामगा या खात्याचा पदभार स्वीकारण्याचे मंत्रालयाकडून आदेश
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जून २४ मंगळवार
आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून त्यांची बदली करण्यात आली आहे.आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात.सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसेच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचे नाव प्रसारमाध्यमांमध्ये नेहमी असते.आता विकास आयुक्त,असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.तर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावर राजेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या १८ वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांची तब्बल २१ वेळा बदली करण्यात आली आहे.गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावर पदावर नियुक्ती करण्यात आली होती व आता पुन्हा वर्षाच्या आतच दुसरी बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे हे मूळचे बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे आहेत.या गावाची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच हजाराच्या आसपास असून हे गाव १०० टक्के शेतीवर निर्भर असून कोरडी जमीन असल्याने फार मेहनत घ्यावी लागते.तुकाराम मुंढे यांचे बालपण गावातच गेले आहे.गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायची त्यानंतर आठवडा बाजारात जाऊन भाजी विकायची त्यानंतर आठवड्याभराचा संसार आणि दोन वेळचे जेवण आपल्याला भेटेल अशा दृष्टीने प्रयत्न करायचे अशी गावची परिस्थती होती.तुकाराम मुंढे यांचे गावातच १० वीपर्यंत शिक्षण झाले.जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असतांना तिथली शैक्षणिक,सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच परिस्थितीत शिक्षण घेतले.
तुकाराम मुंढेंची आतापर्यंत कुठे कुठे बदली झाली?
तुकाराम मुंढे हे २००५ सालचे आयपीएस अधिकारी आहेत.सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.२००७ सालापर्यंत ते सोलापूरचे उपजिल्हाधिकारी होते.त्याचबरोबर २००७-प्रकल्प अधिकारी,धारणी,२००८ उपजिल्हाधिकारी, नांदेड,२००८-जिल्हा परिषद सीईओ,नागपूर,२००९-अति आदिवासी आयुक्त,नाशिक,२०१०-केव्हीआयसी मुंबई,२०११ जिल्हाधिकारी,जालना, २०११-१२-जिल्हाधिकारी,सोलापूर,२०१२-सहआयुक्त,विक्रीकर विभाग,मुंबई,२०१२-सहआयुक्त,विक्रीकर विभाग,मुंबई,२०१६-महापालिका आयुक्त,नवी मुंबई,२०१७-अध्यक्ष,पीएमपीएएल,२०१८-महापालिका आयुक्त,नाशिक,२०१८-सहसचिव,मुंबई नियोजन विभाग,२०१८-एड्स नियंत्रण मंडळ प्रकल्प संचालक,२०२०-नागपूर महापालिका आयुक्त,२०२०-सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,मुंबई,२०२१-राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत,२०२२ (सप्टेंबर )-आयुक्त आरोग्य सेवा व संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान,२०२३-मराठी भाषा विभाग,२०२३- पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग,२०२४-विकास आयुक्त (असंघटित कामगार) अशा विविध पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.