वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या !! सदरील घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी !! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जून २४ मंगळवार
वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी भयंकर घटना घडली असून भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली.हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता त्याला वालीव पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे.मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.आरोपीला अटक करण्यात आली असून सखोल तपास करुन न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.