मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जून २४ बुधवार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे पानिपत झाले असून मागच्या वेळी २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाची यावेळची संख्या ९ वर आली आहे तर महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत.यानंतर आता अजित पवारांना पक्षात का घेतले ? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.या चर्चा सुरु झाल्या आहेत त्या ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रात आलेल्या लेखामुळे.यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना बळीचा बकरा केला जात आहे असे म्हटले आहे.उत्तर प्रदेशात मोदींना कमी मते मिळाली याला काय अजित पवार जबाबदार आहेत ? याचे उत्तर भाजपाने द्यायला पाहिजे.भाजपाची मते कमी झाली आहेत.छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर टीव्हीवर,चॅनल्सवरुन बोलणारे लोक कुठे गेले ? हे लोक ऑर्गनायझरवर का बोलत नाहीत ? इकडून तिकडे उड्या मारणारे लोक काय बोलणार ? असे म्हणत आव्हाड यांनी भाजपावर टीका केली.द ऑर्गनायझर मध्ये अजित पवारांना टार्गेट करण्यात आले होते.भाजपाने अजित पवारांना बरोबर घ्यायला नको होते या आशयाचा लेख लिहिण्यात आला होता त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी हे उत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या पक्षात छगन भुजबळ यांची गळचेपी सुरु आहे.मनुस्मृतीबाबत त्यांनी भूमिका घेती होती.छगन भुजबळ यांनी कायमच मला मदत केली आहे.त्यांची त्या पक्षात घुसमट होते आहे हे नक्की आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत तसेच ते पक्ष सोडतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत याबाबत विचारले असता जितेंद्र आव्हाड यांनी हे उत्तर दिले आहे.अमोल कीर्तिकर विजयी झाले आहेत हे मी आधीपासून सांगितले होते. ज्यावेळी वायकर यांना कमी मते मिळाली त्यावेळीच वायकरांच्या नातेवाईकांकडे मोबाइल कसा आला ? सूर्यवंशी नावाच्या ज्या महिला तिथे आर.ओ म्हणून काम करत होत्या त्यांचे कुणाशी संबंध आहेत हे मला माहीत आहे कारण त्या ठाण्यात होता त्यांच्यामुळे सगळ्यांना समजले की ईव्हीएममधून मोबाइलवर ओटीपी येतो असेही आव्हाड म्हणाले.