“तुकाराम मुंढेंची बदली आता थेट अमेरिका किंवा चीनला करा” !! विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर टीका !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ जून २४ बुधवार
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून हटवून विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदलीनंतर आता सरकारवर टीका देखील होऊ लागली आहे.दरम्यान यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.विजय वडेट्टीवर यांनी काल मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.यादरम्यान त्यांना तुकाराम मुंढे यांच्या बदली विषयी देखील विचारण्यात आले यासंदर्भात बोलतांना त्यांची बदली आता अमेरिका किंवा चीनला करा अशी बोचरी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
मला वाटते की,त्यांची बदली आता थेट अमेरिकेतच केली पाहिजे.त्यांची देशात कुठेही बदली केली तरी त्यांचा त्रास होणारच आहे अशी राजकीय नेत्यांनी भावना आहे मग ते आधीचे राजकारणी असोत किंवा आताचे असो मात्र त्यांची एकदाच काय ते अमेरिकेत किंवा रशियात बदली करावी आवश्यकता वाटल्यास त्यांना चीममध्येही पाठवावे असे विजय वडेट्टीवार म्हणाले.तुकाराम मुंढे हे २००५ सालचे आयपीएस अधिकारी असून त्यांची गेल्या १८ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २१ वेळा बदली करण्यात आली आहे त्यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.२००७ सालापर्यंत ते सोलापूरचे उपजिल्हाधिकारी होते.दरम्यान गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावर पदावर नियुक्ती करण्यात आली होती व आता पुन्हा वर्षाच्या आतच दुसरी बदली करण्यात आली आहे.