दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.महाराष्ट्र कोअर टीमची केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक पार पडली असून यावेळी राज्यातील निकालांवर चर्चा झाली असे ते म्हणाले तसेच महायुती आणि मविआमधील मतांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांचाच फरक असून आम्हाला कुठे मते कमी पडली या विषयावर चर्चा झाली असेही त्यांनी सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की,यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या आमच्या रणनीतीवर चर्चा केली असून त्यानुसार आम्ही एनडीएतील घटक पक्षांसोबत विधानसभेच्या चर्चा करू आणि भाजपा पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करेल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.