पुढे बोलतांना त्यांनी राजीनामा देण्याच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले.देवेंद्र फडणवीस केवळ नौटंकी करत आहेत जर त्यांना खरेच पदाची आसक्ती नसेल तर त्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला असता त्यांच्याकडून केवळ दबाबतंत्राचा वापर केला जातो आहे.मात्र भाजपाचे केंद्रातले नेते अशाप्रकारे दबावाला बळी पडत नाही जर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यायचाच असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी टीका त्यांनी केली.दरम्यान नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले असून आपण नाराज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे.माझ्याविषयी ज्या विविध चर्चा केल्या जात आहेत त्यामध्ये तथ्य़ नाही.मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि कायमच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे.मी नाराज आहे,दुसऱ्या नेत्यांना भेटलो आहे.विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली या सगळ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही तसेच माझ्या नाराजीच्या चर्चा साफ खोट्या आहेत असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.