शिवसेना पक्षाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच अजित पवार गटाबाबत मोठे भाष्य केले.रामदास कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले,“फडणवीस साहेब धन्यवाद.मात्र अजित पवार थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते.” अशा शब्दात रामदास कदम यांनी अजित पवार गट महायुतीत आल्याने अशा पद्धतीने नाराजी त्यांनी बोलून दाखवल्याने चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान त्यांच्या या विधानानंतर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आता येत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू होण्याची शक्यता आहे.तर शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर हल्लाबोल करतांना म्हटले होते की,शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली.काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखले.आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे आपण निवडणुकीमध्ये पाहिले.जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी देतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.