आदिवासी विद्यार्थ्यांच्या तक्रारी संदर्भात आदिवासी प्रकल्प अधिकारी एक्शन मोड वर !! तक्रारीबाबत १५ दिवसात दुरूस्ती करण्याबाबत सक्त ताकीद !!
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
जामनेर तालुक्यातील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थांना संस्था चालकांच्या भोंगळ व दुर्लक्षीत कारभारामुळे निकृष्ठ जेवणासह शासकीय सोयी सुविधा व आदी योजना पासुन वंचीत ठेवण्यात येत असुन संप्तत झालेल्या विद्यार्थी व पालकांनी तसेच आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांची भेट घेवुन आपल्या तक्रारी मांडल्या.दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार हे एक्शन मोड वर आले असुन त्यांनी संबधीत स्कुलच्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरून पंधरा दिवसाच्या आत विद्यार्थ्यांंच्या सर्व तक्रारींचे निराकरण न झाल्यास आपण संस्थेची मान्यता रद्द करू अशी तंबी दिली आहे.
या संदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांचे पालकवर्ग व आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या संयुक्तरित्या देण्यात आलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,जामनेर जिल्हा जळगाव येथील जैन इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासुन निकृष्ठ प्रतिचे व अवेळी जेवण दिले जात आहे.याशिवाय विद्यार्थ्यांना एकच गणवेश व नाईट ड्रेस दिला जातो तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर वहया व पुस्तके मिळत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वस्तीगृहाची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन त्यांना दिले जाणारे गादया,चादर,अंघोळीचे साबण,तेल, ईत्यादी वस्तु या नावालाच दिल्या जात आहेत.या ठीकाणी वस्तीगृहातील शौचालयची अवस्थाही अत्यंत वाईट असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. दरम्यान मुले आणी मुली हे एकाच वस्तीगृहात राहतात याशिवाय अनेक तक्रारी या निवेदनात करण्यात आल्या आहेत.प्रसंगीविद्यार्थी पालक व संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांची भेट घेवुन समस्यांचा पाढाच वाचला.यावेळी जैन इन्टरनॅशनल स्कुलचे उपप्राचार्य निविन वानखेडे यांना प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी आलेल्या तक्रारीबाबत १५ दिवसात दुरूस्ती करावी अशी सक्त ताकीद दिली असुन १५ दिवसानंतर प्रकल्प स्तरीय समिती संबधीत स्कुलला भेट देवुन तक्रारींचे निराकरण झाले आहे का नाही याची तपासणी करेल व त्यात जर दुरूस्ती आढळुन न आल्यास संबधित संस्थेविरूध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल असा ईशारा प्रकल्प अधिकारी पवार यांनी दिला आहे. सदर निवेदनावर आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नामा पावरा,संस्थेचे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रविण पावरा यांच्यासह आदि पदाधिकारांच्या स्वाक्षरी आहे.यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे,प्रकल्प विकास निरिक्षक जावेद तडवी,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिनाक्षी सुल्ताने यांच्यासह आदि अधिकारी उपस्थित होते.