शहर जिल्हाध्यक्ष श्री.पाटील म्हणाले,राज्यातील जनतेत महायुती सरकारबद्दल तीव्र असंतोष धुमसतोय त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसले व तो ट्रेलर होता.विधानसभा निवडणुकीत उर्वरीत पिक्चर दिसेल.सामान्य जनता महायुतीच्या प्रत्येक नेत्याला त्याची जागा दाखवेल. महागाई,बेरोजगारी,नीट परीक्षा घोटाळा,खते व बियाणांचा काळाबाजार,घरगुती वीज बिलात भरमसाठ वाढ,पेपरफुटी या समस्यांतून सामान्य माणूस पिचला आहे.कांदा,कापूस,सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही.कठीण काळात जनतेची पिळवणूकच केली जात आहे.या आंदोलनात प्रा.डॉ. सिकंदर जमादार,माजी नगरसेवक अय्याज व वहिदा नायकवडी,मंगेश चव्हाण,मयूर पाटील,अल्ताफ पेंढारी,इलाही बारुदवाले,तौफिक शिकलगार,जतचे तुकाराम माळी,बाबासाहेब कोडग,अमित पारेकर,महावीर पाटील आदीसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.