पुरूषोत्तम ऊर्फ खंडू दिगंबर बन्ने वय ४० रा.पत्र्याची तालीम,उत्तर कसबा,सोलापूर असे खून झालेल्या शेतक-याचे नाव असून त्यांचे बंधू देवीदास बन्ने वय ४२ हे सुध्दा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.यासंदर्भात जखमी देवीदास बन्ने यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शांतप्पा आडके,सागर आडके आणि बाळू आडके रा.देगाव,सोलापूर यांच्यासह त्यांच्या सात ते आठ साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत पुरूषोत्तम ऊर्फ खंडू बन्ने व त्यांचे बंधू देवीदास बन्ने यांच्या मालकीची बाळे शिवारात शेतजमीन असून त्यांच्या शेतालगत आडके कुटुंबीयांची शेती आहे परंतु शेतजमिनीच्या हद्दीवरून त्यांच्यात वाद होता.दरम्यान हद्दीचा वाद मिटविण्यासाठी बन्ने बंधुंनी आपल्य शेतजमिनीची शासकीय मोजणी करून घेण्याचे ठरविले व त्यानुसार शेतात शासकीय यंत्रणेमार्फत शेतजमिनीची मोजणी सुरू असताना त्यास आडके कुटूंबीयांनी जोरदार हरकत घेतली व शेताची मोजणी करायची नाही अन्यथा एकेकाला खलास करू असे म्हणत आडके कुटुंबीयांसह त्यांच्या साथीदारांनी बन्ने बंधुंवर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केला यात पुरूषोत्तम ऊर्फ खंडू बन्ने यांचा मृत्यू झाला तर देवीदास बन्ने हे गंभीर जखमी झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.