यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ जून २४ सोमवार
शहरात नगर परिषदच्या विस्तारित कार्यक्षेत्रातील वसाहतीत भटक्या कुत्र्यांमुळे नागरीकांना धोका निर्माण झाला असुन दुचाकी वाहन चालकांमध्ये या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे.नगर परिषदच्या वतीने या मोकाट कुत्र्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्याप पर्यंत कोणतील उपाययोजना करण्यात आल्याचे दिसुन येत नसून प्रशासनाने तात्काळ या धोकादायक मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.
शहरातील विस्तारित वसाहतीमध्ये भुसावळ रोड ते आयशानगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर याशिवाय पांडूरंग सराफ नगरवस्ती तसेच यावल भुसावळ रस्त्यावरील फालक नगर बस थांबा अशा शहरातील विविध सार्वजनिक ठीकाणी सांयकाळी व रात्रीच्यावेळी पाच ते सात कुत्र्यांचे टोळके हे रस्त्याच्या मधोमध बसलेले असतात व सदरील मोकाट हे कुत्रे एकत्र येवुन दुचाकी वाहनचालकांच्या अंगावर धावत जातात त्यामुळे वाहनधारक आपला जी वाचविण्याकरिता बेतुफान गाडी चालवीत असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. अशावेळी रात्रीच्या वेळेस दुचाकी वाहनधारकांना घराबाहेर जाणे अवघड झाले आहे.अशा वेळी वाहनाचा तोल जावुन मोठा अपघात होवु शकतो.तरी यावल नगरपरिषदने या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.