विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला धक्का !! माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार ?
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ जून २४ मंगळवार
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोनदिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात विविध चर्चांना उधाण आले होते मात्र आता त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून आज दि.२५ जून मंगळवार रोजी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही सांगितले जात आहे.महत्त्वाचे म्हणजे सूर्यकांता पाटील यांनी यापूर्वी अनेक वर्ष शरद पवार यांच्याबरोबर काम केले आहे.२०१४ पूर्वी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत्या मात्र २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला होता.
दरम्यान भाजपाने सूर्यकांता पाटील यांना गेल्या १० वर्षात कोणतीही मोठी जबाबदारी दिली नव्हती त्यामुळे त्या पक्षात नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती अशातच त्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यामुळे विविध चर्चांनादेखील उधाण आले होते.