विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक दाखल्यांसाठी तालुका पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे- शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांची जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जून २४ बुधवार
तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणीक कामासाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे विद्यार्थी व पालक यांची चांगलीच त्रधातिरपीट होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.सदरहू विद्यार्थ्यांना सदरील दाखले मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक भविष्याचा विचार करीत तात्काळ फैजपुर प्रांत कार्यालयातुन दाखले मिळवण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेना (शिंदे) गटाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
शिवसेना (शिंदे) गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यंदा सन २०२४-२५ हे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून प्रांत अधिकारी मागील काही दिवसांपासून सुटीवर गेल्याने व त्यांच्या ठीकाणी नियुक्त केलेले अधिकारी हे नियमीत येत नसल्याने या कार्यालयातुन विविध शैक्षणीक कार्यासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी विद्यार्थी पिळवणुक व त्यांच्या पालकांना भटकंती करावी लागत असुन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांना त्वरीत दाखले मिळवुन देण्यासाठी तालुका पातळीवर मेळावे व शिबीराचे आयोजन करावे जेणे करून विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात तात्काळ प्रवेश मिळवता येईल.तरी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यासंदर्भात गांर्भीयाने विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी नितिन सोनार यांनी निवेदनाव्दारे केली आहे.