कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचे आणि रोष व्यक्त करायचा.आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत,रामराम घालायचा आहे,शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचे आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचे आहे असे आवाहन तुम्ही आमची भूमिका समजून घ्या,आम्ही १५० वर्षांपासून आरक्षणात आहोत पण आम्हाला हे माहिती नव्हते की आम्ही आहोत.आता आम्हाला माहिती झाले आहे त्यामुळे नोंदी पाहून तुम्हीही म्हटले पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण असेही मनोज जरांगे म्हणाले.मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सगे सोयऱ्यांसह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे व त्याबाबतही त्यांनी भाष्य केले असून मनोज जरांगे म्हणाले,१३ जुलैनंतर सरकारचे काहीही ऐकून घेणार नाही असे त्यांनी म्हटले.तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचे सरकार म्या पलटी केलच समजायचे हे इतके दिवस बोललो नव्हतो पण आता बोलणे आवश्यक आहे असेही मनोज जरांगेंनी म्हटले आहे.उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी गावात आले त्यावेळी गावकऱ्यांना उद्देशून भाषण केले.मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो,मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचेही जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटले आहे.