मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे,शिवसेना ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर,भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे,शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत.सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात जास्त नोंदणी केलेल्या उमेदवाराला विजयाची नेहमी संधी असते.कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहे.ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत.मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रांपर्यंत येेणे हेच या मतदारसंघात मोठे आव्हान आहे.नाशिक शिक्षक मतदारसंघात विद्यामान आमदार किशोर दराडे,व संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत.या मतदारसंघातील निवडणूक ही पैसे,साड्या वाटपांच्या आरोपांमुळे अधिक गाजली.शिंदे गटाने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला.