चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जून २४ बुधवार
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवाशी व माजी ग्रामपंचायत सदस्य महेश रामराव बोरसे (पत्रकार) यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
फैजपूर ता.यावल येथे नुकतीच ओबीसी मोर्चा बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी महेश रामराव बोरसे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव अजय भोळे,जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा धनंजय पाटील,भरत महाजन,वासुदेव नरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.महेश बोरसे यांची ग्रामपातळीवरून ग्रामपंचायत सदस्य पदापासून सुरुवात करीत आता भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना जिल्ह्याभरातुन विविध स्तरातून तसेच आप्तस्वकीय,मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.