Just another WordPress site

वळोदे उपसरपंच शितल बोरसे यांचा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीसांच्या हस्ते सत्कार

चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ जून २४ गुरुवार

तालुक्यातील वेळोदे येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी शितल मनोज बोरसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस महेश बोरसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.एका सुशिक्षित महिलेला वेळोदे गावाच्या उपसरपंच पदाचा मान मिळाल्याबद्दल त्यांच्या उपसरपंच निवडीचे वेळोदे गावासह परिसरात अभिनंदन केले जात आहे.

दरम्यान वेळोदे येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा पदभार शितल मनोज बोरसे यांनी नुकताच स्वीकारला असून यानिमित्ताने पोलीस नायक तालुका प्रतिनिधी व भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस महेश रामराव बोरसे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला तसेच शीतल बोरसे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी ग्रामसेवक राकेश देवरे,सरपंच सुंदरबाई वसंत कोळी,ग्रामपंचायत सदस्य संजय नारायण बोरसे,नूतन दीपक नेरपगारे,संजय नारायण बोरसे,पुष्पलता शांताराम सोनवणे,सुनंदा रामराव चौधरी,कैलास चैत्रम पावर,देवीदास सोनवणे,नैनेश्वर मंगा करणकडे,सुनंदा श्रीराम चौधरी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.