मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जून २४ गुरुवार
येथील पद्मावती इंटरटेंमेंट व अर्चना थिएटर्स तसेच डी.एस.तायडे सर डीएस मुसिकल इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ जून २४ शनिवार रोजी दुपारी ३.३० वाजता सावित्रीबाई फुले ऑडिटोरियम डोंबिवली (पूर्व) याठिकाणी ‘आरडी बर्मन बाय ट्यालेंटेड किड्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरील आगळ्या व वेगळ्या अशा या कार्यक्रमात निवडक अशा गायक मुला-मुलींना या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले गायनातील गुण सादर करण्यास संधी मिळणार आहे.तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्यातील डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या खेडेगावातील सुपुत्र व सध्या डोंबिवली मुंबई येथील मुंबई प्राधिकरणात सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत राहून सेवानिवृत्त होऊन वास्तव्यास असलेले तसेच आपल्या गायनाच्या सातत्यपूर्ण व दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कामगिरीची युएसए ने दखल घेऊन त्यांच्या कामगिरीची ‘युएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नुकतीच नोंद करण्यात आलेले त्याचबरोबर फिनौमिनाल म्युजिक ग्रुप तर्फे संपूर्ण भारत भरात घेण्यात आलेल्या गाण्याची प्रतियोगिता स्पर्धेत विश्व विजेतेपद पटकावलेले श्री.डिगंबर सिताराम तायडे हे राहणार आहे.तरी गायनाची आवड असणाऱ्या प्रतिभावान गायक मुला-मुलींनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख आयोजक डिगंबर सिताराम तायडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमात शिरीष सराफ,डिगंबर तायडे,विशाल सपकाळ,करण बालानी,रुजूल गोयथळे,राणा जाधव,साई जोशी,राजयोग धुरी,स्रेया राठीश,मोकेश कटारिया,इवा फाटक,वाळदीक डवले,किशोर मिरगल,श्रीशा स्वरांजली,नादब्रह्मा संगीत कलामंदिर यांचे सहकार्य लाभणार आहे.