यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जून २४ गुरुवार
येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉ.कुंदन फेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड मॉ के नाम’ या अभियानास प्रतिसाद देत यावल येथे आपल्या परिसरात वृक्ष रोपणाची सुरुवात केलेली असून वृक्षारोपण मोठ्या संख्येने करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतुन ‘एक पेड मा के नाम’ या अभियानाला संपुर्ण देशात सुरुवात करण्यात आली असून त्यानुसार यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांनी त्यांच्या मातोश्री कलावती सुधाकर फेगडे यांचेसोबत वृक्षारोपण करून कार्यकर्त्यांना व तालुका वासियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला प्रतिसाद द्यावा व हे अभियान मोठ्या उत्सुकतेने पार पाडावे असे आवाहन त्यांनी केले आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्ग वाचवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे म्हणून वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असेही डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगीतले आहे.यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमास डॉ.कुंदन फेगडे यांच्या मातोश्री सौ.कलावती फेगडे,डॉ.प्रशांत जावळे,सुरेश जावळे,सागर लोहार आदी यावेळी उपस्थित होते.