देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेते सभागृहात जाण्यासाठी लिफ्टच्या बाहेर उभे होते त्याचवेळी त्या लिफ्टच्या जवळ उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर आले यानंतर उद्धव ठाकरे,मिलिंद नार्वेकर,देवेंद्र फडणवीस आणि इतर काही नेते एका लिफ्टमधून सभागृहात दाखल झाले. दरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिले असून ही भेट योगायोगाने झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र होतो. आता यावरून अनेकांना असे वाटले असेल की ते एक गाण आहे.ना ना करते प्यार…,म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही.ना ना करते प्यार…, तुम्ही से प्यार कर बैठे असे काही होणार नाही.ती भेट एक योगायोगाने झालेली भेट होती.ते म्हणतात ना,भिंतीला कान असतात मात्र लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्यामुळे आम्ही या पुढच्या आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू अशी मिश्किल प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.दरम्यान या अधिवेशनात आरक्षणाचा विषय गाजण्याची शक्यता आहे.यावर सरकार कशा पद्धतीने मार्ग काढणार ? विरोधक सरकार विरोधात कोणते मुद्दे मांडणार ? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.