विदर्भ,मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कुणी वाली राहिलेला नाही.१० हजार २२ कोटींची नुकसान भरपाई देणे बाकी आहे.जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत.शेतकऱ्यांच्या हातात किंवा खात्यात पैसे येणे बाकी आहेत.जानेवारीपासून १ हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.काही ठिकाणी फक्त ७० रुपये जमा झाले आहेत.उद्याच्या अधिवेशनात डबल इंजिन सरकार आलेले आहे.एनडीएचे सरकार हे दुर्दैवाने देशावर आले आहे.आता डबल इंजिन सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती.आता जाहीर मागणी आहे की तुमच्या थापा खूप झाल्या, घोषणा खूप झाल्या अजूनही साडेतीन महिने आहेत.तुम्ही निवडणुकीच्या आत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करा.फडणवीसांच्या काळात कर्जमुक्तीची घोषणा झाली ती अद्याप सुरु झाली ती योजना पूर्णच झाली नाही असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.आता नुसत्या घोषणा नकोत, अंमलबजावणी करा.आधी योजनांची अंमलबजावणी करा मग निवडणुकीला सामोरे जा असाही सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.डबल इंजिन सरकारने केंद्रातल्या सरकारची मदत घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे.लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊ अशीही योजना आणा व या योजनेत स्त्री आणि पुरुष भेद करु नका.कर्ता पुरुष असतो तसे अनेक घरांमध्ये कर्ती महिलाही असते.चंद्रकांत पाटील आज मला चॉकलेट देऊन गेले तसेच मोफत शिक्षणाचेही चॉकलेट दिले होते ती योजना पोकळ ठरली आहे व आता लोकांची सहनशक्ती संपली असून गाजर दाखवून तुमचे काम होणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.