Just another WordPress site

भारतात या लोकांनी जातीयवाद पसरविला -साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

जातीयतेची किड नष्ट करण्याची गरज

देशातील जातीय व धार्मिक तणावाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असतांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व कोसला कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे महत्वाचे विधान नुकतेच केले आहे.आपल्या देशामध्ये खानेसुमारी सुरु करून जातीयता पसरवली असे त्यांनी म्हटले आहे.जळगावातील चित्रकार राजू बाविस्कर लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी डॉ.नेमाडे यांनी आपले विचार मांडले.

जातीयता व जाती व्यवस्था या भिन्नभिन्न असून यातील फरक समजुन घेणे गरजेचे असल्याचे डॉ.नेमाडे यांनी नमुद केले आहे.तसेच खाणेसुमवारीची सुरुवात करून इंग्रजांनी आपल्या देशात खऱ्या अर्थाने जातीयतेचे बिज रोवले.सदरील जातीयतेतील विषमता नष्ट न होता उलट जातीयतेतील तेढ दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली.तसेच यावेळी त्यांनी आपल्या देशातील जातीयव्यवस्थेबद्दल व भारतीय परंपरा,रामायण,महाभारत यांचे द्रुष्टांत देऊन जातीयव्यवस्थेची किडीचा नाश करण्याबाबत आपले विचार मांडले.लेखकांना आजच्या घडीला संरक्षण घेऊन वावरावे लागत आहे हे भयंकर काळाचे प्रतीक आहे म्हणजेच याचा अर्थ असा कि समाजाचे गणित बिघडत चालले आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे.लेखकांना आता जशी रिस्क घ्यावी लागत आहे तशीच रिस्क आता वाचकांनी घेतली पाहिजे असेही डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.