स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यात वरित सोडवाव्या- तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार नाझीरकर यांना मागण्याचे निवेदन सादर
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जून २४ शुक्रवार
राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पुर्तता करून धान्य वितरणातील अडचणी सोडविण्यासंदर्भात येथील तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज दि.२८ जून शुक्रवार रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरककर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
येथील तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार मोहन मला नाझीरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मागील अनेक वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या,अडीअडचणी व समस्या यांची प्रशासनाच्या वतीने सोडवणूक करण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही.६ जानेवारी २०२४ रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री महोदयांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती व या बैठकीत धान्य दुकानदारांच्या मागण्या सोडविण्या संदर्भात तसेच मार्जिन मध्ये पन्नास रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती आणि निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असे मंत्रि महोदयांनी आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत या विषयाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.सदरहू राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदाराच्या प्रश्नावर आणि प्रलंबित मागण्यावर राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विधान विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्रिस्तरीय आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वस्त धान्य दुकानदारांनी निवेदनात दिला आहे.सदर निवेदनामध्ये रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये किमान शंभर रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी तसेच शासकीय धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या गोणी वजनात ५० किलो पेक्षा कमी धान्य भरत असल्याने दुकानदारांना प्रत्यक्ष धान्याच्या गोणीचे वजन करून देण्यात यावे यासह अन्य सहा मागण्यांचा समावेश आहे.सदरील निवेदनावर तालुका अध्यक्ष बाळू नेवे,माधव साळुंखे,दिलीप नेवे,सविता नेवे,न्हावी मल्टीपर्पज सोसायटी,मंगल माहूरकर,रंजना नेवे,फैजपूर विकास सोसायटी यांचेसह सुमारे ३० स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत.