जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जून २४ शुक्रवार
जळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेतुन पडलेल्या चिमकुलीचा जिव वाचविणाऱ्या पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांचा आज दि.२८ जून शुक्रवार रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे सन्मानार्थ सत्कार करण्यात आला.सदरहू देवदूत पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी फिरोज तडवी हे शासकीय कामासाठी गुरुवारी पहाटेच्या सुमारास नाशिककडे जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकावर उभे होते.या ठिकाणी सेवाग्राम एक्सप्रेस आल्यानंतर त्यातून एक महिला आपल्या दोन मुलांसोबत रेल्वेतून उतरत होत्या.यात एक चिमुकला कडेवर असतांना दोन वर्षाची चिमुकली मात्र त्यांच्या हातातून निसटल्यामुळे ती थेट रेल्वेखाली रूळावर जाऊन पडली त्यामुळे भेदरलेल्या मातेने एकच आक्रोश सुरू केला व जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर उडी घेतली.सदरील घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या फिरोज तडवी यांना समजली.दरम्यान रेल्वेला सिग्नल
मिळालेला असतांना देखील फिरोज तडवी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट रेल्वेखाली उडी घेतली व त्यानंतर रुळावर पडलेली चिमुकलीला सुखरूप बाहेर काढत तिच्या आईच्या ताब्यात दिले.त्यामुळे मराठीत म्हण आहे की ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय उपस्थित असलेल्यांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला.परिणामी सदरील पोलीस कर्मचाऱ्यांचे या हिंमतीचे जिल्ह्याभरातुन कौतुक होत आहे.तर दोन दिवसापुर्वी जळगाव येथे रेल्वेतून पडलेल्या चिमुकलीसाठी देवदूत ठरलेल्या पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांचा यानिमित्ताने जळगाव पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष भूषण नगरे,नदीम शेख,हेमंत तावडे व यांच्यासह जिल्हयातील असोसिएशनचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.