Just another WordPress site

यावल सुतगिरणी मालमत्तेची नियमबाह्य खरेदीबाबत नगर परिषदच्या दिड कोटी रूपये कर वसुलीचे काय ? माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२८ जून २४ शुक्रवार

येथील जे टी महाजन सहकारी सुतगिरणीच्या सातबारा उताऱ्यावर यावल नगर परिषदचा १ कोटी ५५ लाख रूपयांचा बोजा असतांना खरेदी विक्री करण्यात आलेले खरेदीखत रद्द करण्यात येवुन अशा प्रकारच्या बेकायद्याशीर व्यवहार करणाऱ्या संबधितांवर त्वरीत कायद्याशीर कार्यवाही करण्यात यावी असे तक्रार निवेदन यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना नुकतेच दिले आहे.

या संदर्भात यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,यावल येथील जे टी महाजन सहकारी सुतगिरणी यावल यांचेकडून नगरपरिषदची कराची रक्कम गेल्या अनेक वर्षापासून थकीत आहे.याबाबत नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कराची रक्कम मिळावी म्हणून पत्रव्यवहार व नोटीस देवुन देखील कराची रक्कम वसुल होत नसल्याने कराची रक्कम ही वाढत असल्याने यावल नगर परिषद ने जे टी महाजन सहकारी सूतगिरणी यांचे मालकीचे मौजे यावल येथील शेत गट क्रमांक २१-३०पैक्की २१-३१, २१-३२ पैक्की व ईतर अशा क्षेत्रावर दुय्यम निबंधक यावल यांचेकडून वरील मालमत्तेच्या ७/१२ च्या उताऱ्यावर सन २०१५-१६ पर्यतच्या कराची रक्कम ५३ लाख ६८ हजार व भाडेकरारानुसार १४ जून २०१२ ते ३१ मार्च २०१३ व दि.१४ एप्रिल २०१३ ते १ एप्रिल २०१३ चे बिलची रक्कम ५१ लाख ८२ हजार १४८ अशी एकुण रक्कम एक कोटी ५५ लाख बसविण्यात आला होता.

दरम्यान यावल जेटी महाजन सूतगिरणी यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांचेकडून जेडीसीसीच्या माध्यमातुन कर्ज घेतले असल्याकारणाने व हे कर्ज देखील थकीत झाल्याने व कर्जवसुल होत नसल्याने जिल्हा बॅेकेने देखील कर्ज रक्कमच्या वसुली ही थकीत राहील्याने जेडीसीसी बँकेने देखील सुतगिरणीवर बोजा बसविला होता.सदरील कर्जाची रक्कम वाढत गेल्याने ही रक्कम वाढत गेल्याने व कर्जवसुल होत नसल्याने जिल्हा बँकेने सुतगिरणी अखेरीस ताब्यात घेत कालांतराने सुतगिरणीस विक्री काढली व सुतगिरणी ही शैलेश प्रभाकर खाचणे राहणार फैजपुर यांनी दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी ५ कोटी ८५ लाख रूपयांना खरेदी केलेली आहे.वास्तविक पाहता कोणतीही मालमत्ता खरेदी करीत असतांना मालमत्तेचा ७/१२ उतारा हा बोजारहीत केल्याशिवाय खरेदीखत नोंदविता येत नाही किंवा बोजा असलेल्या संस्थेकडून किंवा बँकेकडून नाहरकत एनओसी दाखला प्राप्त करून घेवुन व बोजा असलेल्या थकीत रक्कमेच्या ५ टक्के इतकी रक्कम मुद्रांक शुल्क भरणा केल्याशिवाय खरेदी खत नोंदविता येत नाही.वरील व्यवहाराचे खरेदीखताचे अवलोकन केले असता असे कुठलेही नाहरकत प्रमाणपत्र नगर परिषदने दिलेले नसतांना सदरचे खरेदीखत हे सर्व नियम धाब्यावर ठेवून नोंदविण्यात आले आहे.

सदरच्या सुतगिरणीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर यावल नगरपरिषद,तहसीलदार यावल,अन्नपुर्णा नागरी पतसंस्था यावल,सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी खरेदीखत नोंदवुन घेतले आहे जे नियमबाहय आहे व बेकायद्याशीर आहे.नगरपरिषद आपल्या कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकाकडून कर भरणा वसुल करण्यासाठी नोटिस मुदतीत मालमत्ता धारकाकडून विहीत मुदतीत कर वसुली करीत असते.यावल जे टी महाजन सहकारी सुतगिरणी यांचेकडून मार्च २०२४ अखेर पर्यंत यावल नगर परिषदचे ३ कोटी ५४ लक्ष ६२ हजार पाचशे नव्वद इतकी थकबाकी असुन या थकबाकीमुळे नगर परिषदची कर वसुलीची टक्केवारी ही कमी होत आहे.नगर परिषद करीत असलेल्या थकबाकीमुळे अपेक्षीत प्रमाणावर होत नसल्याने वित्त आयोगाचा निधी कमी प्रमाणात प्राप्त होत आहे.जे टी महाजन सहकारी सूतगिरणी यावल यांच्या मालमत्तेवर नगर परिषद यांचा एक कोटीच्या वर रक्कमेचा बोजा असतांना दुय्यम निबंधक यावल यांनी नगर परिषद यांना कुठलीही विचारणा न करता किंवा नाहरकत प्रमाणपत्र न घेता परस्पर खरेदीखत नोंदविले आहे.या खरेदीच्या बेकायदेशीर गोंधळामुळे नगर परिषद प्रशासनास थकबाकी वसुली करण्यास बाधा निर्माण झाली आहे.यावल दुय्यम निबंधक यांच्या नियमबाहय व बेकायद्याशीर कृत्यामुळे यावल नगर परिषदचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यावल सुतगिरणीच्या झालेल्या नियमबाह्यरित्या आणी बेकायद्याशीर झालेल्या या संपुर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ चौकशी करण्यात येवुन यातील सर्व दोषींवर कायद्याशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.