स्विफ्ट डिझायर कार (क्र.एमएच.१२.एमएफ.१८५६) डिझेल भरल्यानंतर निघाली होती तर ईरटीका कार (क्र.एमएच.४७.बीपी.५४७८) ही  नागपूरहून मुंबईकडे निघाली होती.सदरील अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने बचाव कार्य करत दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.दोन्ही कारमधील १०-१२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ४ प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे तर एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेतील मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ.उमेश जाधव यांनी दिली आहे.