“शेतकारी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प”- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निराधर निराश्रितचे उपाध्यक्ष जलीलदादा पटेल यांची प्रतिक्रिया
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ जून २४ शनिवार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी,महिला व विद्यार्थी अशा सर्वच घटकांवर विविध सवलती आणि अनुदानांच्या योजनांचा वर्षाव करणारा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल शुक्रवार रोजी सादर केला असल्याची बतावणी सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे.मात्र एक लाख दहा हजार कोटींची वित्तीय तूट तसेच २० हजार कोटींची महसुली तूट असतांना या सर्व योजनांसाठी आणखी एक लाख कोटींचा बोजा सरकारवर पडणार असून त्यासाठी निधी कुठून मिळणार याचे उत्तर या अर्थसंकल्पात नसल्यामुळेच की काय विविध विकास कामांच्या तरतुदीला सदरील अर्थसंकल्पात कात्री लावण्यात आली आहे.मात्र सवलतींचा वर्षाव करणाऱ्या या ‘सेवे’मागचे आर्थिक गणित न उलगडल्याने ‘तुका म्हणे बरा !! लाभ काय तो विचारा !!’ असा तुकारामाचा प्रश्न या अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे असे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस निराधर निराश्रित व व्यक्ती विकासचे उपाध्यक्ष जलीलदादा पटेल यांनी ‘पोलीस नायक’शी बोलतांना म्हटले आहे.
परिणामी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात कर्ज असतांना या सर्व योजनांसाठी आणखी एक लाख कोटींचा बोजा सरकारवर पडणार असून तो जनतेच्या माथी मारण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा आहे.तसेच सदरील अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या हातात गाजर देण्याचे काम करण्यात आले असून शेतकारी आणि सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस निराधर निराश्रित व व्यक्ती विकासचे उपाध्यक्ष जलीलदादा पटेल यांनी ‘पोलीस नायक’शी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.