“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या”
विनोद माहुरे,पोलीस नायक
यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.४ जुलै २४ गुरुवार
राळेगाव तालुक्यातील खैरी येथील रहिवाशी कलावती लक्ष्मण बुरडकर वय ५८ वर्ष या महिलेने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला लागणाऱ्या कागदपत्रे पुराव्यांची पुर्तता करण्यास असमर्थ ठरल्याने तसेच योजनेला असलेल्या मुदतीत आपण सदरील योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करु शकत नसल्याने मी लाडकी बहीण या योजनेतुन दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपये लाभापासून वंचित राहणार तर नाही ना ? या नैराश्येतून सदरील महिलेने काल दि.३ जुलै २४ बुधवार रोजी शेतातुन मजुरी करुन आल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.सदरील घटनेमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चर्चेचा विषय ठरत आहे.सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळतात खैरी बिट जमदार रमेश आत्राम,अविनाश चिकराम यांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला तर पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.
सदरहू ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदतीची अटच कशाला ? अनेक महिला या सासरी आहे तर अनेक महिला निरनिराळ्या कारणांमुळे बाहेरगावी आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदत दिल्याने काही महिलांचे कागदोपत्री पुरावे हे लवकरच होणार असे नाही त्यामुळे महिला चिंतातुर होऊन यापलीकडे पण अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मारेहचा आहेर की बहिणीच्या गळ्यात असलेला गळफास ? अशी चर्चा जिल्ह्याभरात चर्चिली जात आहे.