Just another WordPress site

“वृक्षरोपण हा उपक्रम भविष्यातील येणाऱ्या पिढयांसाठी शुद्ध व सुरक्षीत पर्यावरणाची हमी देणारा असेल”-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे डोंगर कठोरा आश्रमशाळा वृक्षारोपणप्रसंगी प्रतिपादन

यावल (प्रतिनिधी) :-

दि.६ जुलै २४ शनिवार

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी आश्रमशाळांमध्ये वृक्षरोपण कार्यक्रमाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याभरात राबविला जात असून या कार्यक्रमा अंतर्गत यावल प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १७ शासकीय वस्तीगृह, १७ शासकीय आश्रम शाळा व ३२ अनुदानित आश्रम शाळांनी या उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवला आहे.त्याअनुषंगाने काल दि.५ जुलै शुक्रवार रोजी तालुक्यातील डोंगर कठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेत ‘प्रत्येक वृक्षाचे जतन व संगोपन व्हावे’ या दृष्टीकोणातुन आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास वृक्षाचे पालकतत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.तसेच त्यानिमित्ताने तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा डोंगर कठोरा येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले आश्रम शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयुष प्रसाद जिल्हाधिकारी,जळगाव,जमीर शेख उप वनसंरक्षक,यावल विभाग जळगाव,अरुण पवार आदिवासी प्रकल्प अधिकारी व मोहनमाला नाझीरकर तहसीलदार,यावल हे उपस्थित होते.सदरील उपक्रमात जिल्ह्यातील बारा वन विभागाच्या रोपवाटिकेमधून १२ हजार रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आला तसेच यावल एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प व यावल वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळांमध्ये एकाच दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हे विशेष !.

दरम्यान वृक्ष रोपणाचे महत्त्व अनन्यसाधारण असून वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात व ऑक्सिजन सोडतात ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते तसेच वृक्ष जमिनीची धूप थांबवतात,पाण्याची शुद्धता राखतात व जैवविविधता वाढवतात.वृक्षामुळे उष्णतेची लाट कमी होते आणि पर्यावरणातील संतुलन राखण्यास मदत होते.तसेच हवामान बदल हे एक गंभीर आव्हान असून वृक्ष लागवड हे त्याविरुद्ध एक प्रभावी उपाय आहे.वृक्ष वातावरणातील ग्रीनहाऊस वायूंची मात्रा कमी करतात ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी होते त्यामुळे वृक्ष लागवड हा पर्यावरण रक्षण व हवामान बदलावर नियंत्रण आणण्यासाठी एक महत्वपूर्ण उपाय आहे व या वृक्षरोपण कार्यक्रमामुळे पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे परिणामी हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध व सुरक्षित पर्यावरणाची हमी देईल असे मनोगत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.

उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख,आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्यासह प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना वृक्षरोपण करण्याचा संदेश दिला.या संदेशात वृक्ष लागवड हे आपले कर्तव्य आहे आणि त्यामुळे मिळणारे फायदे खूप मोठे आहेत.वृक्ष लागवडीमुळे पर्यावरण सुधारते,हवेतील प्रदूषण कमी होते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाची हमी मिळते  तसेच आपल्या जीवनात लागू करून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा असा संदेश दिला.कार्यक्रमाचे नियोजन अरुण पवार प्रकल्प अधिकारी यावल प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली पवन पाटील,आर.एम.लोवणे (सहाय्यक प्रकल्प अधिकारी) जावेद तडवी (आदिवासी कार्यालय निरिक्षक) व शिक्षण विभाग,प्रकल्प कार्यालय यावल) व यावल पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे व पश्चिम विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे,रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी केले.प्रसंगी आश्रम शाळांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.