Just another WordPress site

वादळात घर कोसळुन आई वडील गमावलेल्या अनाथ बालकाची व्यथा पाहून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे डोळे पाणावले !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.७ जुलै २४ रविवार

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील थोरपाणी (आंबा पाणी) या पाडयावर २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळात घर कोसळुन झालेल्या भिषण दुर्घघटनेत नानसिंग पावरा व त्यांची पत्नी सोनुबाई पावरा यांच्यासह कुटुंबातील दोन वर्षाचे बाळ आणी तिन वर्षाची मुलगी अशा दोन लहान चिकुल्यांसह चार जणांचा कोसळेल्या घराच्या ढीगाऱ्यात गुदमरून अत्यंत दुदैवी मृत्यु झाला होता.या घटनेतील देव बलवत्तर म्हणुन सुदैवाने बचावलेल्या ८ वर्षीय शांतीलाल पावरा या अनाथ झालेल्या लहान मुलास शाळेच्या युनिफॉर्ममध्ये पाहून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवत धिर देतांना त्या बालकाच्या डोळयातुन अश्रु निघाले व या ठीकाणी उपस्थित वातावरण सर्व लोक अधिक भावनिक झाल्याने त्या आई वडीलांच्या मायेची छ्त्र हरवलेल्या अनाथ मुलाकडे पाहुन अखेर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेही डोळे पाणावले.

दरम्यान सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील थोरपाणी (आंबा पाणी) या पाडयावर २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळात घर कोसळुन झालेल्या भिषण घटनेत नानसिंग पावरा व त्यांच्या पत्नी सोनुबाई पावरा यांच्यासह कुटुंबातील दोन वर्षाचा बाळ आणी तिन वर्षाची मुलगी अशा दोन लहान चिकुल्यांसह चार जणांचा कोसळेल्या घराच्या ढीगाऱ्यात गुदमरून अत्यंत दुदैवी मृत्यु झाला होता.या घटनेतील देव बलवत्तर म्हणुन सुदैवाने बचावलेल्या ८ वर्षीय शांतीलाल पावरा यास राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाच्यावतीने प्रत्येकी चार लाख प्रमाणे १६ लाख रुपयांच्या मदतीचे सुरक्षीत ठेवचे कागदपत्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते मयतांचे वडील गुला पावरा व मयतांचा एकमेव वारस असलेला शांतीलाल पावरा यांच्या स्वाधिन करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदिवासी वस्ती व पाडयांवर राहणाऱ्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ कसा दिला जाईल या करीता त्वरीत व अधिक वेगाने प्रयत्न करण्याच्या सुचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्या.यावेळी आदिवासी प्रकल्प अधिकारी अरूण पवार,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्यासह आदि विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.