Just another WordPress site

यावल नगरपरिषद बोजा सुतगिरणी प्रकरणी आपण जेडीसीसी बँक व जिल्हा सहनिबंधक यांच्या अभिनिर्णयाने खरेदी नोंद केली-दुय्यम निबंधक वैशाली जावळे यांची प्रतिक्रिया 

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.७ जुलै २४ रविवार

२१ कोटी रूपयांची मालमत्ता प्रकरणी येथील जे टी महाजन सहकारी सुतगिरणीही कर्जबाजारीमुळे वादाच्या भोऱ्यात सापडली असतांना शासकीय यंत्रणेने सर्व नियम धाब्यावर ठेवुन नियमबाह्य खरेदी करून दिली असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे.तसेच या संपुर्ण नियमबाह्य बेकायद्याशीर रित्या करण्यात आलेल्या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली असुन याबाबत यावलच्या दुय्यम निबंधक वैशाली जावळे यांनी ‘पोलीस नायक’ न्युजशी बोलतांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

सदरहू आपण सदरच्या सुतगिरणीची खरेदी नोंद जेडीसीसी बॅंक व जिल्हा सहनिबंधक यांनी घेतलेल्या अभिनिर्णयाच्या आधारावर आणी नियमांच्या चाकोरीत राहुन केली असल्याचे दुय्यम निबंधक वैशाली जावळे यांनी म्हटले आहे.दरम्यान यावलच्या दुय्यम निबंधक वैशाली जावळे यांनी जे टी महाजन सहकारी सुतगिरणीवर नगरपरिषद सुमारे दिड कोटी रूपयांसह ईतरांचा थकबाकीचा बोजा असतांना या सूतगिरणीचा खरेदी नोंदणी कशी झाली? असा प्रश्न तक्रारीत उपस्थित केला असुन या संपुर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होवुन कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते तथा यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.