‘आदिवासीशिवाय जंगल नाही व जंगलवाचुन आदिवासी नाही’ या संकल्पाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून घोषणा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ जुलै २४ रविवार
वनविभाग यावल उपवनसंरक्षक यांच्या संकल्पनेतून आदिवासी बांधवाचे वनातील गौण वन उपजापासून शाश्वत रोजगार मिळावा याकरीता यावल वन विभाग जळगांव तसेच उमेद स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विदयमाने यावल पूर्व वनक्षेत्रात वनमहोत्सव सप्ताहानिमीत्त आदिवासी बांधव,ग्रामस्थ व शेतकरी तसेच वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांना पाच दिवसीय लाख,मध,डिंक,बाबू व मोहा या गौण वनोपजाचे उत्पादन,व्यवस्थापन आणि कौशल्य वाढवण्याचे प्रशिक्षण फाऊडेशनचे अध्यक्ष विरेंद्र छाजेड व त्यांच्या चमूकडून नुकतेच देण्यात आले.दरम्यान प्रशिक्षणार्थी आदिवासी ग्रामस्थ,शेतकरी,बचत गट सदस्य संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन कर्मचारी यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते व यावल वनविभागाचे उपवनवंरक्षक जमीर शेख,आदिवासी प्रकल्प विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार,तहसिलदार यावल मोहनमाला नाझीरकर यांच्यासह आदि मान्यवरांच्या उपस्थितीत वनमहोत्सवाच्या निमिताने आयोजित प्रशिक्षण सप्ताहात प्रामुख्याने सहभागी झालेल्या वन कर्मचाऱ्यांना व आदिंना प्रमाणपत्र वाटप करुन मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘आदिवासींशिवाय जंगल नाही व जंगलावाचून आदिवासी नाही’ ही संकल्पना उदघोषीत करुन त्याचे महत्व समजाऊन सांगितले तसेच आदिवासी बांधव व शेतकरी यांच्या विकासाला जंगल व वनविभाग कसा पुरक आहे तसेच वने व मनुष्य जिवन यांचा ताळमेळ बसवून जिवनमान कसे उंचावेल याबाबत मार्गदर्शन केले.तसेच वनांपासून मिळणारे गौणवनोपज मनुष्य जिवनात किती महत्वाचे आहेत आणि कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी उत्पन्नांचा महत्वाचा स्त्रोत आहे याची जाणीव करुन दिली.त्याचबरोबर जंगल वाचविणे ही फक्त वन विभागाची नव्हे तर आपल्या सर्वांची नैतीक जबाबदारी आहे याकडे लक्ष वेधले.दरम्यान आदिवासींच्या विकासाठी सर्व यंत्रणाच्या समन्वयासह यावल वनविभाग कटीबध्द राहिल अशी ग्वाही जमिर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगांव यांनी या प्रसंगी दिली.वन महोत्सवानिमीत्ताचे औचित्त साधुन देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मॉ के नाम’ या संकल्पनेतून मोफत वृक्ष वाटप केले तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगांव यांच्या हस्ते तालुक्यातील डोंगर कठोरा येथील आश्रम शाळेत तसेच मनवेल येथील आदिवासी आश्रम शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रमात आदिवासी ग्रामस्थ यांच्यासह जमीर शेख,उपवनसंक्षक,यावल वन विभाग जळगांव, स्वप्निल फटांगरे,वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व,सुनिल भिलावे,वनपरिक्षेत्र अधिकारी,यावल पश्चिम,अजय बावणे,वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, आनंदा पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन यावल तसेच वन कर्मचारी यांनी सहभाग घेतला.यावेळी आदिवासी बाधवांचा सर्वांगीन विकास करुन सातपुडा हिरवा करण्याकरीता यावल वनविभाग प्रयत्नशील असल्याचे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी म्हटले आहे.