जिल्ह्यातील आजी माजी आमदार,खासदार व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश !! यावल तालुक्यातील एकोणावीस गावांसाठी ५९२ कोटींच्या उपसा जलसिंचन योजनेला मान्यता !!
यावल पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ जुलै २४ रविवार
तालुक्यातील सुमारे एकोणावीस गावातील ९१२८ हेक्टर शेतीला लाभ मिळवणाऱ्या ५९२ कोटीच्या शेळगाव बॅरेज वरून उपसा सिंचन योजना साठी महाराष्ट्र शासनाने दिली तत्त्वतः प्रशासकीय मान्यता दिल्याने यावल तालुक्यातील शिवसेना ( शिंदे गटा ) च्या वतीने यावल येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.यावल व चोपडा तालुक्यासाठी वरदान ठरणारी शेळगाव बॅरेज उपसा जलसिंचन योजनेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला मान्यता दिली असुन ही योजना व्हावी म्हणून कै.माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शक ग्रामविकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे जळगाव मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील चोपडा विधानसभेच्या आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच भारतीय जनता पक्षाची जळगाव पूर्व अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या अथक प्रयत्नाने या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे यावल येथे शिंदे शिवसेना गटातर्फे भुसावळ टी पॉइंटवर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
सदर सिंचन योजनेचा शेळगाव बॅरेज वरून रावेर मतदार संघातील यावल तालुक्याच्या शेत शिवार क्षेत्रातील येणाऱ्या यावल,सांगवी बु,चितोडा, अट्रावल,सातोद,कोळवद या गावातील ४४२८ शेतकऱ्यांना ९ हेक्टर क्षेत्राला आणी चोपडा मतदार संघातील साकळी,नावरे,विरावली, महलखेडी,कोरपावली,दहिगाव,वाघोदे,चुंचाळे,गिरडगाव,वडोदे,दगडी,बोराळे,शिरसाड या गावांच्या ४६९९ शेतकऱ्यांना १३ हेक्टर या शेत शिवार क्षेत्राला या सिंचन योजनेचा लाभ होणार आहे.शेळगाव मॅरेज वरून या गावांमध्ये शेत शिवारात पाणी आणून पूर्वी प्रमाणे गतवैभव निर्माण करण्यासाठी स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी अगोदर पाठपुरावा केला होता त्यांच्या निधनानंतर चोपडा मतदार संघाचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व भाजपाचे जळगाव जिल्हा पूर्व विभागाचे अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे आणि रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे सलग सप्टेंबर २२ पासून आठ ते दहा वेळा प्रस्ताव सादर केलेले होते.तरी या संदर्भात माजी खासदार कै.हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांनी सुद्धा त्याच धर्तीवर पाठपुरावा केलेला होता तर रावेरचे आ. शिरीष चौधरी यांनी या गावांसाठी लेखी पत्रव्यवहार केलेला होता.
केंद्रीय भूजल यंत्रणा या विभागाने यावल तालुक्यातील बहुतेक भाग हा डार्कझोन घोषित केलेला आहे.या लाभक्षेत्रातील भूजल पातळी तीनशे फुटापेक्षा खोल जाऊन दरवर्षी सरासरी तीन ते पाच फुटाणे खालावत आहे असा २००७ ते २०१८ पर्यंतच्या अहवालामध्ये नमूद केलेले आहे.या धर्तीवर ही उपसा सिंचन योजनेस महाराष्ट्रातील महायुती शासनाने लक्ष घालून प्रशासकीय मान्यता दिली आहे.
यानिमित्ताने यावल तालुक्यातील एकोणावीस गावांसाठी या योजनेला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली त्याबद्दल शिंदे शिवसेना गटाच्या वतीने यावल शहरातीत भुसावळ टी पॉईंटवर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.यावेळी भरत चौधरी चुंचाळा,विनोद खेवलकर,महेंद्र चौधरी,तुषार ठोसरे,प्रमोद सोनवणे,पराग महाजन,रवींद्र धनगर,वेदांत सुतार,संदेश ठेवलकर,गणेश कोळी,संजय राजपूत,उमाकांत निळे, दीपक कोळी,संजय माळी,भरत चौधरी महेलखेडी,गंगाराम कोळी,दिलीप कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.