यावल-भुसावळ रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघाताला आमंत्रण !! सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जुलै २४ सोमवार
शहराला लागून असलेल्या यावल-भुसावळ मार्गावरील रस्त्यावर मध्यभागी निर्माण झालेले व अपघाताला आमंत्रण देणारे जिवेघेणे खड्डयांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही का ? असा प्रश्न वाहनधारकांमध्ये उपस्थित होत आहे.
यावल शहरातील भुसावळ टी पॉईटजवळ भुसावळ मार्गावरील मुख्य रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासुन एका मॉलसमोर आणी याच सस्त्यावर काही अंतरावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रवेशव्दारासमोर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी खड्डे निर्माण झाली आहे.यावल ते भुसावळकडे जाणारा हा राज्यमार्ग असुन या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.दरम्यान या खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वारंवार अनेक वेळा दुचाकी वाहनांचे अपघात होत असुन अनेकांना अपघातामुळे मिळालेल्या दुखापतीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वाहनधारक आणि नागरीकांच्या वतीने अनेकवेळा यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी हे या अतिशय गंभीर अशा विषयाकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसुन येत आहे.तरी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांना दुरूस्त करण्यासाठी पाऊल उचलावी अन्यथा या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती वाहनधारक व शहर वासियांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.