यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जुलै २४ मंगळवार
तालुक्यातील भालोद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रतिभा कुंभार यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दरम्यान कुंभार समाजातील महिला सदस्या प्रतिभा कुंभार यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे परिसरात कौतुक केले जात आहे.
तालुक्यातील भालोद ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित ग्रामविकास पॅनलची एक हाती सत्ता असुन त्यामध्ये सरपंच प्रदीप कोळी यांच्या नेतृत्त्वाखाली ठरल्याप्रमाणे उपसरपंचपद एक वर्ष देण्यात येते.दरम्यान विद्यमान उपसरपंच लीना नेहेते यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भारतीय जनता पार्टीचे पुर्व विभाग जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व सरपंच प्रदीप कोळी यांच्या संमतीने भालोद गावातील कुंभार समाजातील महिला सदस्या प्रतिभा कुंभार यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यात प्रथमच भालोद परिसरात कुंभार समाजातील महिलेला ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले हे विशेष !.
येथे ग्रामपंचायतची मासिक सभा सरपंच प्रदीप श्रीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व यावेळी उपसरपंच म्हणून प्रतिभा कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,गणेश नेहेते,भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी आदींनी अभिनंदन केले.याप्रसंगी सरपंच प्रदीप कोळी,ग्रामविकास अधिकारी बी.के.पारधी,ग्रामपंचायत सदस्य लीना नेहेते,जाबीर खान,सचिन भालेराव,मनोज जावळे,अमोल महाजन,नंदा पाटील,विद्या चौधरी,वैशाली झांबरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.