Just another WordPress site

यावल तालुक्यात दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या रांगेतील हरिपुरा,वड्री व मोरधरण ओव्हरफ्लो

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ जुलै २४ मंगळवार

यावल तालुक्यात सर्वत्र मागील दोन दिवसापासून पाऊसांची रिपरीप सुरू असुन तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले धरण हे ओव्हरफ्लो झाली आहेत.

दरम्यान तालुक्यात यावल शहर (३७.१मिली मिटर),फैजपुर (५४.०० मिली मिटर),भालोद (५३.०० मिली मिटर ),बामणोद (५८.३ मिलीमिटर), साकळी (३७.६मिली मिटर ) तर किनगाव (२७.६ मिलीमिटर ) अशा एकुण २६७.६ मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.सदरील दमदार पावसामुळे परिसरातील शेतकरी बांधव आनंदीत झाला असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान तालुक्यातील मध्य प्रकल्प म्हणुन ओळखले जाणारे हरिपुरा धरण व वड्री धरण ऑव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या स्टेप ( पायऱ्यावरून )पाणी ओसांडून वाहत असुन या ठीकाणी येणाऱ्या व परिसरातील राहणाऱ्या नागरीकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा ईशारा दिला आहे.दरम्यान तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या रांगेत असलेल्या मोर धरण,वड्री धरण व हरिपुरा धरण हे दोन दिवसांपासुन होत असलेल्या दमदार पाऊसामुळे ओव्हरफ्लो झाली असल्याने या परिसरातील हडकाई खडकाई व भोनक नदीला काही प्रमाणात तर मोर नदीला पुराचे पाणी दुथडी भरून वाहू लागले आहे.यावेळी येणाऱ्या काही तासात पाऊसाचा वेग वाढणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आले असुन तालुक्यातील नदी काठावरील गावांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने सर्तकतेचा ईशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.