ज्योती लक्ष्मण जाधव -(प्राथमिक शिक्षिका)
पोलीस नायक न्यूज (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २४ गुरुवार
राज्यशासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रम २०१७ नुसार शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.सदरील प्रशिक्षणामुळे तसेच मूल्यवर्धन मेळावा आशा विविध आयोजित कार्यक्रमामुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमानूसार जबाबदार संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावे म्हणून मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यास मदत होत आहे तसेच मूल्यवर्धन उपक्रम बालस्नेही व विद्यार्थकिंद्रित असल्याकारणाने सहयोगी अध्ययन, अध्यापन व ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पद्धतीचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सोपे झाले आहे.त्याचप्रमाणे अभ्यासक्रम व मूल्यवर्धन यांच्यामध्ये सहसंबंध जोडून अध्यापन केल्यामुळे मुले ही नैसर्गिकरीत्या मूल्य स्वीकारत आहेत परिणामी मुले केवळ परीक्षार्थी न बनता त्यांचा नैतिक व भावनिक विकास होऊन मुले भावी सुजान नागरिक बनू शकतील.
ज्योती लक्ष्मण जाधव
(प्राथमिक शिक्षिका) जि. प. प्रा. शाळा काळाडोह, ता यावल जि जळगाव