डिगंबर तायडे व त्यांच्या पत्नी सौ.शकुंतला तायडे “आयकॉन ऑफ नेशन ” पुरस्काराने सन्मानित
रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पुणे येथे नुकताच संपन्न
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ जुलै २४ गुरुवार
जळगाव जिल्ह्यातील डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका लहानशा खेडेगावातील सुपुत्र व रिटायर्ड सिव्हील इंजीनीयर, एम.एम.आर.डी.ए.मुंबई तसेच आपल्या गायनाच्या सातत्यपूर्ण व दैदिप्यमान कामगिरीमुळे ” महाराष्ट्राची शान ” म्हणून नाव लौकिक मिळविलेली विभूती म्हणजेच डिगंबर सिताराम तायडे व सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ.शकुंतला डिगंबर तायडे यांना “रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) द्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभा,गुणवत्ता,सेवाभाव,कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेमुळे असामान्य कार्य करणाऱ्या मुलांना,महिला-पुरुष व्यक्ती आणि संस्थांना कार्यप्रवण करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देवून पुरस्कृत करण्याची दैदिप्यमान परंपरा असून सदरील दाम्पत्याने उत्तम,उदात्त व उन्नत कार्य केल्याबद्दल त्याची दखल घेवून त्या कार्यामागील राष्ट्र धर्मासाठी तत्पर कार्यवीरांची नोंद घेत त्यांना नुकतेच ” रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) द्वारे अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनांच्या माध्यमातून सदर दाम्पत्यास “आयकॉन ऑफ नेशन ” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स अंतर्गत नोंदणीकृत वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशनद्वारे संचालित रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) हे रेकॉर्ड संपादन भारत सरकारच्या इंटरनॅशनल सिरीज बुक नंबर (आयएसबीएन /ISBN) अंतर्गत प्रकाशित केले जाते.सदरील पुरस्कार हे भारत आणि आशियाई देशात आयोजित विविध समारोहांच्या माध्यमातून आरटीबीआर च्या माध्यमातून सदरील पुरस्कार हे प्रदान केले जातात.
दरम्यान विश्वशांती,राष्ट्रीय सुरक्षा,जलसंस्कृती संवर्धन,आजीवन अध्यापन,राष्ट्रीय एकात्मता,सहिष्णुता,आंतरराष्ट्रीय सौहार्द,महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा,व्यसनमुक्ती,योगा-निसर्गोपचार,सायबर सुरक्षा,मैत्रीभाव,सैनिक कल्याण,कला-संस्कृती,क्रीडा-साहित्य संवर्धन,न्यायशास्त्र व मूल्य, नि:ष्पक्ष पत्रकारिता,उन्नत भारत व विकसित भारत या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या संकल्प सिद्धीकरीता ‘ रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ‘ (आरटीबीआर) ही एकमेव स्वायत्त संस्था अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलनांचे अत्यंत प्रभावीपणे जागतिक मंचावर आयोजन करणारी क्रियाशील संस्था आहे.त्यांच्या वतीने आजवर भारताचे राष्ट्रपती,उपराष्ट्रपती यांसह देशातील विविध राज्यपाल,रेमेन मॅगसेसे विजेता,भारत सरकारचे पद्मश्री-पद्मविभूषण विजेते,विविध देशांचे राजदूत,कुलगुरू,भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे अधिकारी,पोलीस विभाग,आयएएस व आयपीएस अधिकारी,साहित्यिक,सीने अभिनेते,नामवंत खेळाडू,उद्योगपती आणि गणमान्य व्यक्तींनी ‘ रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ‘ (आरटीबीआर) च्या आजवरच्या उपक्रमांना गौरविले आहे.अलिकडेच भारत सरकारने G-20 सचिवालयाच्या संचालक स्तरावर आणि भारताच्या राज्यपालांनी रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स (आरटीबीआर) चा सन्मान केला आहे.महत्वाची बाब म्हणजे ” वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन ” च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित झाले आहेत.यामुळेच प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या विक्रम-मानांकन जगतातील अत्युच्च गुणवत्ता जोपासून उदात्त उद्दिष्टांच्या पूर्ततेकरीता प्रतिबद्ध असणाऱ्या ” रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ” (आरटीबीआर) मध्ये भारत देशासह संपूर्ण आशिया खंडातील इच्छुकगण त्यांची असामान्य प्रतिभा,कौशल्य,कार्य,प्राविण्य आणि बुद्धिमत्ता सादर करून नोंदणीसाठी पुरस्कारार्थ अर्ज सादर करतात.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सांस्कृतिक नगरी पुणे येथे संपन्न झालेल्या विशाल समारोहाच्या अनुषंगाने जम्मू राज्याच्या राणी डॉ.सुहासिनी आणि पद्मश्री पुरस्कार विजेता डॉ.विजयकुमार शहा,संमेलनाध्यक्ष डॉ.कौशिक गायकवाड यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि ” वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्सचे ” संस्थापक व मुख्य संपादक,जगप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. क्रांती महाजन, स्वागताध्यक्ष श्री.संतोष बारणे,राजामाता जिजाऊ यांच्या घराण्याचे वंशज श्री.शिवाजी राजे जाधव,तंजावर घराण्याचे वंशज श्री.विजयसिंह राजे भोसले,भारत सरकारच्या G-20 चे डायरेक्टर तथा रूडकी आयआयटी चे रजिस्ट्रार संजीव जैन्थ,भारत सरकारच्या एनवायकेएसचे मेघालय, मणिपूर,नागालँडचे संचालक अतुल निकम,गोवा व महाराष्ट्र राज्याचे संचालक यशवंत मानखेडकर,कॅनडाचे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ.गुरतेजसिंग ब्रार,सीआयडी ऑफिसर आरिफा मुल्ला,समाजसेवक यशवंत कुर्वे,चीफ एडज्यूकेटर ज्युरी डॉ.एस.देवेंद्र,पुणे यांच्या शुभहस्ते भारत देशातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या प्रतिभाशाली कार्यवीरांना ” सतरावे अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलना ” च्या पार्श्वभूमीवर “आयकॉन ऑफ नेशन” या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच अंगभूत अद्भुत बुद्धिमत्ता व प्रतिभा धारण करून विविध क्षेत्रात गुणवत्ता व प्रविण्य सिद्ध केल्याबद्दल निवडपात्र पुरस्कारार्थी यांना “रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स” (आरटीबीआर) मध्ये समाविष्ठ करीत आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह,गोल्ड-मेडल आणि मेम्बरशिप बहाल करून गौरविण्यात आले.महत्वाचे म्हणजे याप्रसंगी चीफ एडिटर डॉ.क्रांती महाजन यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण पुस्तक “रयतेचा राजा “,”सुभाष सिक्रेट ” या पुस्तकांचे व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उत्तराखंड राज्याचे विद्यमान महामहिम राज्यपाल लेफ्टनंट जनरल श्री.गुरमित सिंगजी यांच्या जीवनावरील “महामहिम राष्ट्रपुरुष ” या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.प्रसंगी
जम्मू राजघराण्याच्या वंशज राणी डॉ.सुहासिनी यांना समारंभपूर्वक ब्रँड एम्बासिडर म्हणून नियुक्त करण्यात आले.पुणे शहरात संपन्न झालेल्या या विशाल पुरस्कार सोहळ्यात उन्नत व विकसित भारताचा पाया रचणाऱ्या व आपल्या मूल्याधिष्ठित कलोपासक कर्तृत्वाने आणि समर्पित साधनेतून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करीत देशाचे नाव जागतिक मंचावर गौरविणाऱ्या भारत देशातील गुणवंत व प्रतिभावंत व्यक्तींना पुरस्कृत कारण्याचे अद्भुत कार्य रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने केले असून वास्तविक अर्थाने याचे पुरस्कारांच्या माध्यमातून प्रेरणा मिळते व प्रेरणेने राष्ट्र बलवत्तर होते असे प्रतिपादन आयोजक डॉ.क्रांती महाजन यांनी यावेळी केले .