Just another WordPress site

‘एक पेड मॉं के नाम’ मोहीमेअंतर्गत आमदार राजु भोळे यांच्या हस्ते चार हजार रोपांचे मोफत वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० जुलै २४ शनिवार

यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना विविध जातीचे सुमारे ४ हजार रोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार राजुमामा भोळे व उप वन संरक्षक जमीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.सदरील कार्यक्रम यावल वनविभाग व जळगाव रेल्वे स्टेशन परिसर भागात मोफत रोप वाटप करून करण्यात आला.

यावल वनविभाग आणि उमेद स्किल डेव्हलपमेंटच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत काल दि.१९ जुलै २०२४ रोजी मोफत रोपवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे होते. कार्यक्रमामध्ये फळझाडांची तसेच इतर प्रकारच्या झाडांची रोपे वाटप करण्यात आली.दरम्यान उपस्थितांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि वृक्षारोपणासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावल वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि उमेद स्किल डेव्हलपमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केले आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे महत्व अधोरेखित केले तसेच सहभागी नागरिकांना रोपांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.प्रसंगी उपस्थितांनी रोपे स्वीकारून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे आभार मानले जात आहेत.सदर कार्यक्रमाला आ.राजूमामा भोळे व सहायक वन संरक्षक प्रथमेश हडपे यांनी उपस्थिताना रोपे व माहिती दिले.वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे व सुनील भिलावे यांनी सुद्धा उपस्थिताना रोपे वाटप केली तसेच या कार्यक्रमाचे प्रेरक म्हणून जमीर शेख उप वन संरक्षक यांनी कार्यक्रमास म्हत्वाचे मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.