Just another WordPress site

आनंदोत्सव जश्न मनानेका : “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमामध्ये डोंगर कठोरा विद्यालयाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शाळेमध्ये आनंदोत्सव साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२१ जुलै २४ रविवार

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने आपल्या यशोशिखरात एक मानाचा तुरा रोवत व अभिमानाने मान उंचविणारी कामगिरी करीत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यात यश मिळविले आहे.दरम्यान यानिमित्ताने काल दि.२० जुलै शनिवार रोजी शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

   

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण गावामध्ये डीजेच्या तालावर देशभक्तीपर गीते व शालेय गीते यावर विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे दांडिया सादर करीत रॅली काढण्यात आली.प्रसंगी संपूर्ण गावामध्ये विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा तसेच ग्रामस्थांचा जल्लोष हा वाखाणण्याजोगा होता हे विशेष !.कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणून करण्यात आली.रॅली दरम्यान गावात ठिकठिकाणी व चौकाचौकात “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमामध्ये डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यात यश मिळविल्याबद्दल त्याच्या रुपरेषेची माहिती प्राचार्य नितीन झांबरे व पी.पी.कुयटे यांनी विशद करून सांगितली.

 

या कार्यक्रमास सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामपंचायत सदस्या आशा आढाळे,शकीला तडवी,केंद्रप्रमुख महंमद तडवी,संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,उपाध्यक्ष राजाराम राणे,सचिव डी.के.पाटील,खजिनदार शरद राणे,जि.प.शाळा मुख्याध्यापिका विजया पाटील,उपशिक्षक शेखर तडवी,प्रदीप पाटील,मुख्याध्यापक नितीन झांबरे,उपशिक्षक एन.व्ही.वळींकर,सचिन भंगाळे,चेतन चौधरी,विवेक कुलट,शुभांगीनी नारखेडे,सोनाली फेगडे,रामेश्वर जानकर,पी.पी.कुयटे,आर,पी.चिमणकारे,मनीषा तडवी,मोहिनी पाटील,शिक्षकेतर कर्मचारी ठकसेन राणे,योगेश पाटील,संदीप सोनवणे,मिलिंद भिरूड,पराग पाटील यांच्यासह विद्यार्थी,विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतिवृत्तांत…..

“मुख्यमंत्री माझी,शाळा सुंदर शाळा” स्पर्धेत निवड झालेल्या शाळांचा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचा !!

सदरील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व धनादेश प्रदान !!

येथील पंचायत समिती हॉलमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा” स्पर्धेत तालुकास्तरावर निवड झालेल्या शाळांचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाला.यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,पुरुजीत चौधरी,गट समन्वयक महंमद तडवी,केंद्रप्रमुख विजय ठाकूर,प्रमोद सोनार,कविता गोहिल,सैयद मुक्तार अहमद,लतिका पाटील,गिरीष सपकाळे,सकिरुद्दिन शेख तसेच संस्थेचे पदाधिकारी डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,डॉ.के.जी.पाटील,अनिल लढे,कृष्णा झांबरे,अर्जुनराव अडकमोल, जावेद तडवी,राजाराम राणे,डी.के.पाटील,शरद राणे,चिंधू झांबरे,प्रमोद झांबरे आदी उपस्थित होते.

दरम्यान सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक,पालक,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा” हे अभियान महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आले होते.यात तालुका पातळीवर उपक्रमाच्या निकषाप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सहभागी झालेल्या सर्व सहभागी शाळांचे अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन १ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले होते.यात निवड झालेल्या इतर व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळामध्ये अ.ध.चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेज डोंगर कठोरा प्रथम,भारत विद्यालय न्हावी व्दितीय
तर डी.एच.जैन विद्यालय कोरपावली तृतीय क्रमांक तसेच शासकीय शाळांमध्ये जि.प.केंद्रशाळा डांभुर्णी प्रथम,जि.प.शाळा शिरसाड व्दितीय
तर जि.प.शाळा दहीगांव तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व धनादेश प्रदान करण्यात आले.यात प्रथम क्रमांक तीन लाख,द्वितीय क्रमांक दोन लाख व तृतीय क्रमांक एक लाख रुपये पारितोषीकांचे मानकरी ठरले आहेत.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी तर सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले.यावेळी यांनी मनोगत पुरुजीत चौधरी,डॉ.के.जी.पाटील,विजय वारके,नितिन झांबरे,विनोद सोनवणे,दीपक चव्हाण,धीरज तायडे यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.मंजुश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन प्रमोद सोनार यांनी केले.यावेळी निवड झालेल्या शाळांच्या संस्थांचे पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.