“केंद्रीय अर्थसंकल्प हा महाराष्ट्राची निराशा करणारा तसेच केंद्र सरकार टिकाव म्हणून धोकादायक आणि भेदभाव करणारा-जलील पटेल
दलबदलु बाबू व नितीश यांना खुश ठेवण्यासाठी त्यांच्या राज्याला विशेष खैरात तर राज्यातील दलबदलुन मिंधेला ठेंगा बजेट
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २४ गुरुवार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी नव्या लोकसभेचा नवा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.परंतु सदर अर्थसंकल्पावर टीका करतांना जलील पटेल यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्राची निराशा करणारा तसेच भेदभावपूर्ण आणि धोकादायक असल्याबाबत कांग्रेसचे निराधार निराश्रित विकास सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जलील पटेल यांनी पोलीस नायक प्रतिनिधींशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकार टिकायला पाहिजे म्हणून दलबदलु बाबू आणि नितीश यांच्या राज्याला विशेष खैरात करण्यात आली असून राज्यातील दलबदलु मिंधेला ठेंगा बजेट सादर करून पुन्हा महाराष्ट्रवर अन्याय करण्यात आला आहे.यात मित्रपक्षांच्या पाठींब्याचा परतावा हा मोदी सरकारने अर्थसंकल्पातून केला आहे परंतु यामुळे अर्थसंकल्पात महाराष्ट्राविषयी चकार शब्द न उच्चारता महाराष्ट्रावर अन्याय करण्याचे काम मोदी सरकारने केलेले आहे.दरम्यान संघराज्य आणि निष्पक्षतेची तत्त्वे केंद्र सरकारने पालन केले पाहिजे असे सांगत असतांनाच केंद्र सरकारने ज़ाहिर केलेला अर्थसंकल्प म्हणजे खुर्ची वाचवा अर्थसंकल्प असल्याचा हल्लाबोल कांग्रेसचे निराधार निराश्रित विकास सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जलील पटेल यांनी केला आहे.