यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ जुलै २४ सोमवार
येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांच्या पोलीस सेवेतील प्रवासाचे व प्रशासकीय कामांचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान पोलीस सेवेचा प्रदीर्घ अनुभव आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात वाखाणण्याजोगे काम करणारे आमचे गुरुबंधू असलेले यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्याशी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने प्रदीप ठाकूर यांच्या कार्याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली तसेच स्वयंदीप प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छ्या दिल्या.१९९२ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करणारे आणि जळगाव जिल्हयातील धरणगाव तालुकयातील मूळ रहिवाशी असलेले प्रदीप ठाकूर हे आमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात असे संस्थेच्या वतीने कौतुक करण्यात आले.प्रसंगी मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष तथा ग.स.सोसायटीचे तज्ञ संचालक शिवश्री रामदादा पवार स्वयंदीपचे अध्यक्ष नितीन सोनवणे आणि यावलचे पत्रकार सुनील गावडे हे उपस्थित होते.