यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ जुलै २४ बुधवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून केले.दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती पुजन केले.यावेळी सेतु अभ्यासक्रमावर तसेच PAT चाचणीचे गुणदान कसे करावे ? या विषयावर चर्चा करण्यात आली.सदर चर्चेत प्रत्येक शाळेतील शिक्षक,शिक्षिका यांनी सहभाग घेतला.याप्रसंगी केंद्रप्रमुख महंमद तडवी यांनी प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र सोनवणे ग्रेडेड मुख्याध्यापक बोरखेडे खु यांनी भुषविले.प्रसंगी “वंचितांचे शिक्षण अडचणी व उपाययोजना” या विषयावर ज्योती जाधव (मोटे) यांनी व अर्चना कोल्हे यांनी “चला लिहते होऊ” या विषयावर मार्गदर्शन केले.शिक्षण परीषदेचे सुत्रसंचलन व आभार शेखर तडवी यांनी केले.तर अतुल चौधरी,विपीन वारके,हुसेन तडवी,विजया पाटील,श्रीकांत मोटे व अर्चना कोल्हे यांनी सहकार्य केले.यावेळी केंद्रातील शिक्षक व शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.